गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील एका स्थानिक न्यायालयाने पोलीस मारहाण प्रकरणात जामीन मंजूर केला. त्यानंतर जिग्नेश मेवाणी यांनी सोमवारी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना आव्हान दिलं. आपण मागणी केलेल्या विविध मुद्द्यांवरील तपासासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, तर “झुकेगा नहीं’’ म्हणत १ जुनपासून रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मेवाणी यांनी दिला.