मुंबई शहराचे हरित हृदय समजले जाणारे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' पर्यटकांसाठी एक नवीन संधी घेऊन आले आहे. निसर्गाविषयी माहिती गोळा करत पर्यावरणाचा आस्वाद घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र दिनी 'निसर्ग शाळा' उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याद्वारे वनविभााकडून शाश्वत पर्यटन आणि निसर्ग संवर्धन या विषयांसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमात पर्यटकांना उद्यानामधील जैवविविधता, नैसर्गिक अधिवास, परिसंस्था आणि जैवविविधता संवर्धन, इत्यादी विषयांची माहिती घेता येईल
#sanjaygandhinationalpark, #park, #zoo, #animals, #animalzoo, #sanjaygandhinationalparkborivali,