राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरून अंबादास दानवेंनी साधला निशाणा
2022-04-30 373
राज ठाकरे नवे सोंग घेऊन भूमिका मांडतात, असा टोला शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी लगावला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, शिवसेनेच्या रक्तारक्तात हिंदुत्व आहे आणि हे आम्हाला दाखवण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.