बीडच्या परळी येथे एका व्यक्तीनं नवीन घेतलेली इलेक्ट्रिक बाईक बंद पडली. वारंवार कंपनीकडे तक्रार करून देखील कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने, बाईकच्या मालकाने चक्क गाढवाला बांधून ही इलेक्ट्रिक बाइक शहरभर फिरवली आहे. या अनोख्या आंदोलनाची चांगलीच चर्चा सुरू आहे. परळीतील सचिन गीते यांनी लोकांना इलेक्ट्रिक बाईक खरेदी न करण्याचं आवाहन केलंय.