मित्रांनो, नाटक म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? रंगमंच, कलाकार, संगीत आणि तिसरी घंटा...नाटकाची हीच चौकट मोडून प्रेक्षकांना 'थिएटर ऑफ रिलेव्हन्स'चा अनुभव देणाऱ्या रंगचिंतक मंजुळ भारद्वाज यांना आजच्या भागात आपण भेटणार आहोत. भारद्वाज गेली ३० वर्ष नाट्यसृष्टीत काम करत आहेत. नाटक हे केवळ प्रस्थापितांचं न ठेवता ते तुमचं आमचं सगळ्यांचं करण्यासाठी त्यांनी 'एक्सपरिमेंटल थिएटर फॉउंडेशन'ची स्थापना केली. मंजुळ भारद्वाज यांच्या नाटकांचे केवळ भारतातच नाही तर विदेशात देखील प्रयोग होतात. 'थिएटर ऑफ रिलीव्हन्स'द्वारे नाट्यसृष्टीत रचनात्मक बदल घडवणं हे भारद्वाज यांचं ध्येय आहे.
#TheatreofRelevance #TOR #manjulbharadwaj