पुण्यातील कात्रजमध्ये पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही विकास न झाल्याने आमरण उपोषण सुरू होतं. मागील दोन दिवसांपासून गावकऱ्यांनी ठिय्या दिला होता. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत गावकऱ्यांना हुसकावून लावलं. कात्रज चौकात नमेश बाबर यांच्याकडून उपोषण सुरू होतं. नागरिकांकडून प्रशासनाचा निषेध सुरू होता. पुणे महापालिकेत कात्रजचा समावेश होऊन २५ वर्ष लोटली, तरी मूलभूत सुविधा व विकास होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी कात्रजसह, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडीतील नागरिक देखील उपस्थित होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करत हे आंदोलन बंद पाडलं. कात्रज व अन्य समाविष्ट गावातील पाणीप्रश्न, वाहतुकीची समस्या यासह महापालिकेचा दवाखाना, खेळाची मैदाने, ई-लर्निंग स्कूल, स्वारगेट-कात्रज मेट्रो अशा प्रकल्पाबाबत अन्याय झाल्याची नागरिकांची संतप्त भावना आहे.
#punenews, #pune, #katraj, #punemunicipalcorporation, #katrajgaon, #municipalcorporation,