शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक झाली. तेव्हापासून सदावर्ते चर्चेत आले. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यात एक गाढव देखील दिसतोय. त्यांच्या गाढवाचं नाव मॅक्स आहे. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील आणि मुलगी झेनचे गाढवासोबत फोटो पाहायला मिळत आहेत. एसटी संपासंदर्भात निकाल लागल्यावर या गाढवाला म्हणजेच मॅक्सला पेढे ही भरवण्यात आले. त्याचे देखील व्हिडिओ आता समोर आलेत.