Nagpur: युक्रेननंतर फिलिपिन्समधील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांचं भवितव्य धोक्यात

2022-04-18 274

नागपूरच्या संविधान चौकात फिलिपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी निदर्शनं केली. भारतीय नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या निर्णयामुळे फिलिपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 20 हजार मुलांचं भवितव्य धोख्यात आलंय. फिलिपिन्समध्ये मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांचा अभ्यासक्रम अचानक नॅशनल मेडिकल कौन्सिलने परिपत्रक काढून रद्द केलाय. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढलीय. फिलिपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये BS कोर्स हा 2 वर्षांचा असतो आणि MD कोर्स हा 4 वर्षाचा असतो. नॅशनल मेडिकल कौन्सिल ने फिलिपिन्समधील BS कोर्सला मान्यता देत नसल्याचं कळवलं. त्यामुळे 2020 आणि 2021 मधल्या प्रवेश घेतलेल्या भारतातील जवळपास 20 हजार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भारत सरकारनं यासाठी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी दोन वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी आज नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. (रिपोर्टर- संजय डाफ)
#russiaukrainewar, #medicalstudents, #MD, #BS, #medicalcourses, #indianmedicalstudents, #indianstudents,