खासदार सुप्रिया सुळे यांचा महिलांना मदतीचा हात; थेट गाडीत बसवलं

2022-04-17 572

खासदार सुप्रिया सुळे आज पुरंदर इंदापूरच्या दौऱ्यावर वर होत्या. यावेळी सासवड वरून इंदापूर कडे जात असताना त्यांना तीन महिला गाडीची वाट पाहत असताना दिसल्या. या महिलांनी गाडीला हात केल्याने सुप्रिया सुळे यांनी थांबून त्यांची विचारपूस केली. सुप्रिया सुळेंनी गाडीतून उतरत या तीनही महिलांना आपल्या गाडीमध्ये बसवले. सुप्रिया सुळेंनी या महिलांची वेळेवर मदत केल्याने हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Videos similaires