मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशिदीबाहेरील भोंग्याच्या भूमिकेनं व्यथित झालेल्या वसंत मोरेंना आज शिवतीर्थावर बोलावण्यात आलं. राज ठाकरे वसंत मोरेंशी बोलून त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतील. नाराज वसंत मोरेचं पुणे शहराध्यक्ष पद काढून घेतल्यानंतर त्यांना शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळालेली. पण तरीही, राज ठाकरेंनी लावलेला मनसेचा बॅच आपण काढणार नाही, अशी भावनाही वसंत मोरेंनी बोलून दाखवली होती. त्यामुळे आज राज ठाकरे आणि वसंत मोरेंच्या भेटीत काय होतं, याकडे पुण्यातील मनसैनिकांचं चांगलंच लक्ष लागलंय.
#rajthackeray, #vasantmore, #vasantmoretomeetrajthackeray, #rMp1oViPb3EdvcJ5kxoqe52RuaiK6YiUYo, #mns, #mnsparty,