आज रामनवमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात खास सजावट केली आहे. 5 हजार सफरचंदाच्या सजावटीने विठुरायाच्या गाभाऱ्याला काश्मिरी बगिचाचे रुपडे प्राप्त झाले आहे. पुण्यातील भक्त भारत रामचंद्र यादव यांनी सफरचंद आणि फुलांचा वापर करीत ही सजावटीची केली आहे. सजावटीसाठी 5 हजार सफरचंदे, पांढरी आणि पिवळी शेवंती आणि दवना यांचा वापर केला आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी ही सजावट करण्यात आली आहे.विठ्ठल मंदिरात विविध सणांना होणारी सजावट ही नेहमीच आकर्षणाचा केंद्र राहिली आहे.