मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेच्या उलट भूमिका घेणारे पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडील शहराध्यक्षपद पक्षानं काढून घेतलं आहे. यावरून बरीच चर्चा सुरू असताना या कारवाईबाबत बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले. "अशी कारवाई होईल, असं वाटलंच नव्हतं", असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
#VasantMore #MaharashtraNavnirmanSena #Pune