वसंतभाऊ, राष्ट्रवादीत तुमचं स्वागत करते; पदावरुन हटवताच रुपाली पाटलांची ऑफर

2022-04-07 1

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने पक्षात मोठा संभ्रम निर्माण झाला. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे या भूमिकेवर नाराज झाले होते. वसंत मोरे यांची आता पदावरुन हकालपट्टी करण्यात आलीय. त्यांच्याजागी आता साईनाथ बाबर यांच्याकडे मनसे पुणे शहराध्यक्षपद असेल. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, 'वसंत मोरे यांच्या विरोधात मनसेने राजकीय खेळी खेळली आहे.' 'वसंत मोरे यांची राजकीय हत्या केली का?' असा सवाल त्यांनी मनसेला विचारला आहे.

Videos similaires