शिवसैनिक आक्रमक! सोमय्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

2022-04-07 0

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये हडपले. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने होतेय. ही मागणी लावून धरत राज्यभरात शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केलं आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधी किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. औरंगाबादेत माजी खासदार चंद्रकांत खैरे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले. ठाणे, रायगड, नाशिक, परभणी, अहमदनगर, सोलापूर, बीड, हिंगोली जिल्ह्यांत सोमय्यांचा निषेध केला. संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांविरोधात गंभीर आरोप केला.

Videos similaires