सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एका पिझ्झा शॉपमधल्या कर्मचाऱ्याला आलिया भटच्या आवाजातील फोन जातो. हा कर्मचारीही तिचा आवाज ऐकून काही वेळासाठी आश्चर्यचकित होतो. पण वास्तव पाहता या व्हीडिओमध्ये चांदणी नावाच्या मिमिक्री आर्टिस्टनं आलियाच्या आवाजात पिझ्झा ऑर्डर केल्याचे पाहायला मिळतय. तिला असा फोन करण्याचा टास्क देण्यात आला. तेव्हा तिने पिझ्झा डिलिव्हरी कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत आलिया भटच्या आवाजात संवाद साधला.