सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस, फळांच्या राजाला फटका

2022-04-06 0

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू व कोकम तसेच सुरगी कळ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झालंय. विजेच्या कडकडाटसह पाऊस पडल्याने रात्री लाईट देखील गेली होती. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तळ कोकणात अजून ३ ते ४ दिवस पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Videos similaires