पुण्यातील कोंढवा भागातील नुराणी कब्रस्तानमधील सुविधांचे लोकार्पण २०१३ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. परंतु राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या दिवशी मशिद आणि अजान बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अज्ञातांकडून या नुराणी कब्रस्तानमधील विकास कामांच्या दगडी पाटीवरील राज ठाकरेंच्या नावाला काळं फासण्यात आलय.