हलाखीची परिस्थिती कामावर जाण्यास भाग पाडतेय; पण एसटी कर्मचाऱ्यांना कोण रोखतंय?

2022-04-04 1

एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण पाहिजे आणि तेही डंके की चोट पे, पण सरकार विलिनीकरणासाठी तयार नाही, कर्मचारी कामावर जायला तयार नाहीत, अनेकांना कामावर जायचंय, पण त्यांना जाणं शक्य होत नाही... एसटी संपात एक ना अनेक समस्या निर्माण झाल्यात आणि अखेर वारंवार तारीख देऊनही एसटी अजून उभीच आहे. या भरकटलेल्या संपाची कारणं काय आहेत ते या व्हिडीओत जाणून घेऊ.. मी देव इंगोल..

कधी नव्हे एसटी कर्मचाऱ्यांचा संप एवढा चिघळलाय. अनेक प्रयत्न करूनही सरकारला तो मिटवता आला नाही, आधीच तुंटपुजा पगार असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आलीय, नैराश्यातून अनेकांनी आत्महत्याही केल्यात. पण सरकारवर मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या समितीचा अहवालही नकारार्थी आलाय. एरवी सरकारला कोंडीत पकडणारे विरोधकही या मुद्द्यावर मात्र आता नरमलेत. पण वकील गुणरत्न सदावर्ते मात्र कर्मचाऱ्यांना अजूनही विलीनीकरण होईल, आपण न्यायालयात लढाई नक्की जिंकू असा विश्वास देतायत, पण सरकार म्हणतंय ते कर्मचाऱ्याने भडकवतायत. या सगळ्यात प्रश्न पडतो विलीनीकरणास सरकार तयार नाही हे स्पष्ट दिसत असताना कर्मचाऱ्यांना ते समजत का नाही?
एवढे दिवस संपात घालवल्याने अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडलीय. अनेकांना कामावर येण्याची इच्छाही आहे, मात्र त्यात सर्वात मोठा अडथळा ठरतोय तो म्हणजे निलंबन. निलंबित झालेले अनेक कर्मचारी खासगीत सांगतात, आम्हाला हजर व्हायचंय पण कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांचं नैतिक दडपण आहे. आमच्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली अन आता आम्ही त्यांना सोडून हजार कसं व्हावं, विलीनीकरणाच्या लढ्यात आत्महत्या केलेल्या, मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांचाही विचार मनात येतो आणि मग हजर व्हावं वाटत नाही. अनेक कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती वाटतेय, त्यात जे लोक आंदोलनात पुढे होते त्यांना तर अधिकारी आपल्याला शत्रूच समजत असल्याचा समज होतोय. कामावर हजर झालो तर अधिकारी त्रास देतील, असं त्यांना वाटतंय. तर अनेकांना अजूनही विलीनीकरण होईल अशी आशा आहे.

Videos similaires