महागाई विरोधात युवासेना आक्रमक; राज्यभरात जोरदार निदर्शनं

2022-04-03 22

देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळं सर्वसामान्य त्रस्त आहेत. वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन मोदी सरकार व भाजपावर वारंवार टीका केली जात आहे. याच महागाईच्या मुद्द्यावरून आज राज्यात युवासेना चांगलीच आक्रमक झाली आहे. युवासेनेच्यावतीने राज्यात महागाई विरोधात ‘थाली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. मुंबईत युवासेनेसोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कार्यकर्त्यांसोबत जोरदार निदर्शने केली. यासोबत कल्याण डोंबिवली, रत्नागिरी, बीड, नंदुरबार जिल्ह्यात देखील आंदोलन करण्यात आले.

Videos similaires