हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मनसे अध्यक्ष मा.राजसाहे ठाकरे व सौ.शर्मिला राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर पाडव्यानिमित्ताने समृद्धीची गुढी उभारली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे व मिताली अमित ठाकरे यांच्या हस्ते गुढीची पुजा करण्यात आली. शिवतीर्थावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सैनिकांना शुभेच्छा दिल्या.