पुण्यातील कोथरूड भागात हिंदू जनजागृती समितीकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन
गुढीपाडव्याचे औचित्य साधुन पुण्यातील कोथरूड भागात हिंदू जनजागृती समितीकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला तर विद्यार्थ्यांनी काही प्रात्यक्षिके देखील सादर केली. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते.