राज्य सरकारने आवाहन केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हायला हवं, जनतेचे होणारे हाल पाहता एसटी कर्मचाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे असं गुलाबराव म्हणाले. सर्व कर्मचाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कामावर यावं, असं आवाहन देखील गुलाबराव पाटील यांनी केलं.