नवीन आर्थिक वर्षात आपण पदार्पण करतोय आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षात काही नवे बदलही होणार आहेत. केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही नियम १ एप्रिलपासूनच लागू होतात आणि याचा थेट संबंध तुमच्या आमच्याशी असतो. काही वस्तूंमधली वाढ असो, की कर रचनेतील बदल, हे सगळे नियम १ एप्रिलपासून लागू होतात. असंच यावर्षीही बरेच बदल होत आहेत आणि त्यातले महत्त्वाचे, सर्वसामान्यांशी संबंधित असलेले पाच बदल मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन वर्षात कोणतीही गोष्ट करायची असेल तर हे बदल आधी नक्की लक्षात घ्या.