धुळेकरांनो सावधान; ड्रिंक अँड ड्राइव्ह केल्यास कठोर कारवाई; नवीन आदेश जारी

2022-03-31 0

ड्रिंक अँड ड्राइव्ह करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने कारवाई केली जाणार आहे.अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत.ड्रिंक अँड ड्राइव्ह केल्यास वाहनधारकांचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहेत.तसेच सदर वाहनधारकांवर खटले दाखल करण्यात येणार आहे.राज्य परिवहन विभागास प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.धुळे जिल्ह्यात 2021-22 या कालावधीत अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले.आतापर्यंत 350 हुन अधिक अपघात झाले आहेत, त्यामध्ये 370 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Videos similaires