७० च्या अनेक पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. पण ३० मे १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला 'जय संतोषी माँ' हा चित्रपट सुपरहिट ठरला. मोठे सेट, थोडेथोडके कॅमेरा वर्क, कमी बजेटमधील हा साधा सरळ चित्रपट प्रेक्षकांना भावला. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. काही ठिकाणी संतोषी मातेचे देऊळ उभारले गेले. तर काही ठिकाणी प्रेक्षक हार, नारळ घेऊन चित्रपट पाहण्यासाठी गेले. तर काही प्रेक्षक हे प्रामुख्याने शुक्रवारीच 'जय संतोषी माँ' हा चित्रपट पाहू लागले.
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #JaiSantoshiMaa #Behindthescene #Entertainment #Bollywood