आयपीएलच्या 15व्या सीझनची सुरुवात युवा खेळाडूंच्या शानदार खेळाने झाली आहे. सुरुवातीच्या सामन्यांपासून सर्वच संघ युवा खेळाडूंवर विश्वास दाखवताना दिसत आहेत. सीझनमधील चौथा सामना गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झाला. दोन्ही आयपीएलचे नवे संघ असून या संघांच्या पहिल्याच सामन्यात अनेक नवे खेळाडूही पाहायला मिळाले तेही शानदार खेळीसोबत.लखनऊ सुपर जाएंट्स टीमने पहिली मॅच हरली असली तरी युवा खेळाडूंळे चर्चेत राहिली आहे. पण संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली. संघाचा कर्णधार केएल राहुलने सीझनमध्ये पहिल्याच सामन्यात एका युवा वेगवान गोलंदाजाला संधी दिली, जो फार कमी लोकांना माहिती आहे. हा खेळाडू वेगवान गोलंदाज म्हणजे मोहसिन खान आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात संत कबीरनगर जिल्ह्यातील शनिचरा पूर्व येथील रहिवासी असलेला मोहसीन खान. लखनौ सुपर जायंट्सने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत मोहसीला विकत घेतलं. मोहसीन खानला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती, त्याचे वडील मुलतान खान यूपी पोलिसात उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. मोहसीनचे वडील मुलतान खान आपल्या मुलाच्या लखनऊ संघात निवड झाल्याने खूप खूश आहेत. मोहसीन खान 2018 पासून आयपीएलचा भाग आहे. 2018 मध्ये, IPL लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतले. त्यानंतर 2020 मध्ये आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने पुन्हा विकत घेतले. यावेळी लखनऊ सुपर जायंट्सने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केली आहे. मोहसीनच्या गोलंदाजीचा वेग ताशी 135 ते 140 किलोमीटर इतका असून या वेगामुळे त्याची निवड करण्यात आली. मोहसीनने आतापर्यंत 27 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 7.13 च्या इकॉनॉमी रेटने 33 विकेट घेतल्या आहेत. नव्या खेळाडूंमध्ये ओळख निर्माण केलेल्या मोहसीनं सर्वांची मने जिंकली.