पुणे महापालिकेच्या सदस्यांची मुदत संपताच शहरातील अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर फिरवण्यास सुरवात झाली आहे. गेल्या 9 दिवसांत 1 लाख 37 हजार चौरफूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले असून एक हजारहून टपऱ्या हटवण्यात आले आहेत. मात्र आता कारवाई करताना अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
पुण्यातील धानोरी लक्ष्मीनगर येथे कारवाई सुरु असताना अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांवर स्थानिक नागरिकांनी जोरदार हल्ला केला आहे. या मारहाणीत अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी, बांधकाम निरीक्षक प्रकाश कुंभार, जेसीबी ऑपरेटर सुभाष कांबळे जखमी झाले आहेत.