सदाभाऊ ते भुयार; राजू शेट्टींचं बोट धरुन मोठे होतात, सत्ता येताच साथ सोडतात

2022-03-29 1

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांना पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी नुकतच पक्षातून निष्कासित केलंय, पण हे पहिल्यांदाच झालंय असं नाही. याआधीही स्वाभिमानीतून तत्कालीन मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत, आमदार भारत नाना भालके यांनीही स्वाभिमानीला सोडचिठ्ठी दिली होती. एवढंच नाही तर त्यांचे फायरब्रॅंड नेते रविकांत तुपकरही काहीकाळासाठी पक्ष सोडून गेले होते. स्वाभिमानीचा इतिहास काय आहे, चळवळीतल्या या नेत्यांना सत्तेत गेल्यावर संघटना नकोशी का होते? बोटाला धरून मोठं केलेल्या प्रत्येकाचे राजू शेट्टींशी खटके का उडतात? सविस्तर समजून घेऊ या व्हिडीओतून...

Videos similaires