उस्मानाबाद जिल्ह्यातील 'पुष्पविहार' लस्सीची मागणी वाढली!

2022-03-29 21

गेल्‍या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने शीतपेयांचीही मागणी वाढली आहे. उन्हाच्या झळा बसल्याने उस्मानाबादमध्ये उसाचा रस, विविध फळांचे ज्यूस, लस्सी, ताक अशा पारंपारिक शीतपेयांसह वेगवेगळ्या थंड पेयांनाही पसंती मिळतीये. त्यामुळे शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आहे. यातच तुळजापुर शहरातील प्रसिद्ध पुष्पविहार लस्सीही सुरु झालीये. 1959 पासून मोहनराव साळुंके यांनी चालु केलेला लस्सीचा व्यवसाय यावर्षीही जोमात सुरु आहे. त्याची मुलं नानासाहेब साळुंके आणि सचिन साळुंके यांनी लसीची तोच गोडवा वर्षानुवर्षे कायम ठेवलाय. मलाई दही पासून बनवलेल्या लस्सीची मागणी ही जिल्हाभर आहे. फेब्रुवारी ते जून या चारच महिण्यात येथे लस्सी मिळते. या लस्सीसाठी ६०० लिटर दूध वापरलं जातं. या कामासाठी येथे १२ कामगार आहेत. यातच तापमानाचा पारा वाढल्याने अधिकचं उत्पन्न मिळतं असल्याचं साळुंके यांनी सांगितलंय. पुष्पविहार लस्सी केंद्रावर सकाळ पासूनच नागरिकांची गर्दी असते. यात शुगर फ्री लस्सी, ताक, मसाला ताक, मँगो लस्सी, बासुंदी, मलाई दही अशा दुधापासून बनलेल्या अनेक शीतपेयांसाठी ग्राहकांची मोठी मागणी आहे. मँगो लस्सी ५० रुपये, शुगर फ्री लस्सी ६० रुपये, मसाला ताक ३० रुपये, साधे ताक ३० रुपये लिटर या दराने मिळेत. सामान्य नागरिकांच्याही खिशाला परवडवणारे दर असल्याने ग्राहक ही समाधानी असतात. साळुंके परिवाराने पुष्पविहार लस्सीचा गोडवा हा उस्मानाबाद जिल्ह्यापुरताच मर्यादीत न ठेवता महाराष्ट्रभर पोहचवलाय...

Free Traffic Exchange