उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर हजर होण्याचं अल्टीमेटम एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. तसेच कामावर हजर न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. मात्र यावर एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फासावर लटकवले तरी चालेल पण विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.