तब्बल ६०० बैलजोड्या आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडली बैलगाडा शर्यत

2022-03-28 1

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर गावात आज बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडाला. रविवारी बदलापूर गावातील मैदानात बैलगाडा शर्यत पार पडली.ज्यात तब्बल ६०० बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. पंचक्रोशीत अशा प्रकारच्या अधिकृत शर्यती पहिल्यांदाच होत असल्याने हजारो प्रेक्षकांनी शर्यती पाहण्यासाठी गर्दी केली होती. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच अधिकृत बैलगाडा शर्यत होती. दिवसभर मोठ्या उत्साहात आणि शिस्तीत बैलगाडा शर्यती पार पडल्या. या शर्यतींमुळे बदलापूर गावाला अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलं होतं.

Videos similaires