चमचेगिरी तर सगळीकडेच होते पण असे चमचे आम्ही पाहिले नाही;संजय राऊत यांची खोचक टीका

2022-03-27 78

चंद्रकांत पाटील यांनी फक्त मोदी हे बावीस तास काम करतात त्यांना फक्त दोन तास झोप मिळते या विधानावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. ते म्हणाले की त्यांचं म्हणणं आहे की जी दोन तास झोप मिळते ती देखील मिळू नये आणि त्यांनी चोवीस तास काम करावं हे ऐकून मोदींची दोन तासांची देखील झोप उडाली आहे. तसेच चमचेगिरी तर सगळीकडे होते पण असे चमके आम्ही पाहिले नाहीत अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे

Videos similaires