राज ठाकरेंसोबत संदीप देशपांडेंचा फोटो; पण चर्चा फक्त मागे दिसणाऱ्या ग्लासचीच

2022-03-27 2,321

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आज वाढदिवस होता. वाढदिवस म्हटल्यानंतर सहाजिकच संदीप देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. राज ठाकरे यांचा आशीर्वाद घेत असतानाचा फोटो त्यांनी ट्विट केलाय. संदीप देशपांडे यांनी हा फोटो ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. आशीर्वाद घेतानाचे फोटो शेअर केल्यानंतर त्यात चर्चा करण्यासारखं काय? परंतु ही चर्चा रंगलीये या फोटोमध्ये दिसणार्‍या एका ग्लास मुळे. संदीप देशपांडे यांनी जो फोटो शेअर केला आहे त्या फोटो मध्ये ते राज ठाकरे यांचा वाकून आशीर्वाद घेतायतं आणि यावेळी याठिकाणी कडेला असलेल्या एका टेबलवर एक ग्लास दिसतोय. आता या ग्लास मध्ये नक्की काय हे कोणास ठाऊक, हा ग्लास नक्की कोणाचा हे देखील माहीत नाही. मात्र त्या ग्लास वरून सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. संदीप देशपांडे यांच्या या ट्विट वरती अनेकांनी रिट्विट करत या ग्लासचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. ट्विटर वापरकर्त्यांनी संदीप देशपांडे व राज ठाकरे यांचा फोटो आणि त्या फोटोमध्ये दिसणारा ग्लासला हायलाईट करत रिट्विट देखील केलयं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Videos similaires