राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर मनसेतून काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादीत आलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी एक वक्तव्य केलं आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी मला जर संधी मिळाली तर मी अत्यंत चांगलं काम करेन. ज्या विश्वासानं मला पक्षात प्रवेश दिला तो विश्वास सार्थ ठरवेन, असं रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.