राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. कधी राजकीय पोस्ट तर कधी मनोरंजन विश्वासी निगडित पोस्ट ते करत असतात. अमोल कोल्हेंची अशीच एक पोस्टची चर्चा आहे. नुकताच अमोल कोल्हे यांनी त्यांच्या हेवी वर्कआऊटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमोल कोल्हे यांनी इन्स्टा पेजवर त्यांच्या वर्कआऊटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते जिममध्ये जोरदार मेहनत घेताना दिसत आहेत. या वर्कआऊटमध्ये टायरने अमोल कोल्हेंचा चांगलाच घाम काढला. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, "यह टायर तो फायर निकला...लेकिन मैं थकेगा नहीं साला" चाहत्यांना मात्र हा व्हिडिओ खूप आवडलेला दिसतोय. शिवाय त्यांच्या कॅप्शनचं देखील कौतुक होतय.