मावळ कुणाचं? संजय राऊतांनी श्रीरंग बारणेंची धाकधूक वाढवली?

2022-03-23 1

पार्थ अजित पवार यांनी २०१९ ला मावळ लोकसभा मतदारसंघातून नशिब आजमावलं आणि दारुण पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. पवार कुटुंबातल्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारणाऱ्या नेत्याचं नाव होतं श्रीरंग आप्पा बारणे.. बारणेंनी फक्त विजयच मिळवला नाही, तर पवारांच्या पुढच्या पिढीला तब्बल सव्वा दोन लाखांच्या फरकाने हरवलं आणि मावळचा नाद सोडा हे थेट सांगितलं. पण याच श्रीरंग बारणेंचा आता संताप अनावर झालाय. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष शिवसेनेने पार्थ पवारांसाठी मावळचा मतदारसंघ सोडावा अशी मागणी झाली आणि शिवसेनेत एकच खळबळ उडाली. पण मोठा ट्वीस्ट तेव्हा आला, जेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यासाठी थेट नकार देणं टाळलं. श्रीरंग बारणेंची धाकधूक राऊतांनी वाढवलीय का, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक मागणीला बळी पडतेय का आणि मावळ मतदारसंघावरुन हा संघर्ष कसा टोकाला जाऊ शकतो हे सविस्तर या व्हिडीओत पाहू...

Videos similaires