श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या ED कारवाईनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

2022-03-22 850

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका ओळीत प्रतिक्रिया दिली. 'मी दिवसभर सभागृहात होतो त्यामुळे या ईडीच्या कारवाईबद्दल कोणतीही माहिती नाही. नेमकं काय घडलंय, यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन नंतर बोलेन. महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्या निकटवर्तीय यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जात आहे का?, असं विचारलं असता तुम्ही जी माहिती देत आहात, त्यावरून ते जाणीपूर्वक केलं जातंय हे समजून जा,' असं आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Videos similaires