साता-यातील वाई तालुक्यात बावधन येथे बगाड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
बावधनच्या यात्रेला होळी पौर्णिमेपासून सुरुवात होते, तर रंगपंचमीदिवशी येथे बगाड भरतं.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक ही यात्रा पाहण्यासाठी येतात.
दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षी बगाड यात्रेस राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित होते.
बावधनच्या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे.
बावधन यात्रेतील वापरल्या बगाडाचं वजन तब्बल २ ते ३ टन इतके असते.
तब्बल दोन वर्षांनी लाखो भाविकांच्या उपस्थितीत बगाड यात्रा जल्लोषात झाली.
या वर्षी बगाड्या होण्याचा मान शेलारवाडी गावातील बाळासाहेब मांढरे यांना मिळाला.
52 वर्षीय बाळासाहेब मांढरे यांनी 2002 केलेला नवस 20 वर्षांनी पूर्ण झाला.