'ठाकरे आणि पवार कुटुंबाच्या पुढच्या पिढीला एकत्र काम करण्याची संधी मिळावी'

2022-03-22 1

शिवसेनेने काँग्रेसससाठी कोल्हापूर जिल्ह्यातली जागा सोडल्याचा वाद ताजा आहे, त्यातच आता आणखी एक जागा शिवसेनेने सोडून द्यावी, असा आग्रह धरण्यात आलाय आणि तोही नेमका पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसालाच. आदित्य ठाकरे यांच्यात जे सामर्थ्य आहे, तेच पार्थ यांच्यात आहे आणि या दोन्ही कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांना एकत्र काम करण्याची संधी द्यावी, अशी थेट मागणी उद्धव ठाकरेंकडे करण्यात आलीय. अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृती लक्षात घेता कोणतीही तक्रार न करता काम केलंय, आदित्य ठाकरेही चांगलं काम करत आहेत आणि आता पार्थ पवारांनाही योग्य संधी देण्याची वेळ आलीय, अशी पोस्ट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केलीय.

Videos similaires