तरुणीने ४० फोन करुन शिक्षकाला घरी बोलावलं; काही तासात होत्याचं नव्हतं झालं

2022-03-21 60

त्या दोघांचंही दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं, एकमेकांना भेटत होते, बोलत होते. पण एक दिवस प्रेयसीने शिक्षक असलेल्या प्रियकराला भेटायला बोलावलं आणि काही तासातच होत्याचं नव्हतं झालं. ही घटना आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गुंजोटी गावची.. लव्ह स्टोरी आणि त्यामुळे होणारे गुन्हे तर तुम्ही अनेक ऐकले असतील, पाहिले असतील.. पण या प्रकरणातल्या तरुणीने शिक्षक तरुणासोबत जे केलंय त्याने कुणाचाही संताप होईल. तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी घरी बोलवत होती. हा फोन घ्यायला तयार नव्हता. पण शेवटी एक, दोन नाही, तर तब्बल ४० वेळा फोन केल्यानंतर जावेद काझी यांनी फोन घेतला. फोन घेतल्यानंतर प्रेयसीचा शब्द ते टाळू शकले नाहीत. तिला भेटण्यासाठी घरी जावं लागलं. भेटण्यासाठी जावेद गेले खरे, पण ते पुन्हा कधीही परत न येण्यासाठीच...

Videos similaires