कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगल्याचं चित्र असतान शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे खासदार विनायक राऊत यांच्यासह विधानभवनात दाखल झाले होते. राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडीतील प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरुद्ध संपुर्ण ताकतीने लढण्याचा निर्धार झाला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.