Shivaji Maharaj Jayanti l प्रतिबिंब रांगोळीतून साकारलं महाराजांचं चित्र l Pune l Sakal

2022-03-21 1

छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. पुण्यात देखील महाराजांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे संपूर्ण शहरात आयोजित केले आहेत. शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने आदरांजली देत श्रीरंग कलादर्पणच्या प्रा. अक्षय शहापूरकर यांनी एक विशेष रांगोळी साकारली आहे.
शिवजयंती निमित्त अक्षय यांनी प्रतिबिंब रांगोळी म्हणजेच अनामोर्फिक रांगोळी तयार केली. याचे वैशिष्ट्य म्हणजे या रांगोळीची कला कुसर आपल्याला सहजपणे लक्षात येणार नाही. या रांगोळीच्या मध्यभागी एक स्टीलचा पाईप ठेवला जातो आणि त्यातून जे प्रतिबिंब दिसतं ते या रांगोळीची खासियत आहे.





#ShivajiMaharajJayanti #ShivJayanti #ShivJayantiSpecial #ShivajiMaharajRangoli #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup