मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना शपथ दिली. आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले स्वराज्य आबाधित ठेवण्यासाठी आम्ही निष्ठेने काम करत राहू. जातीजातीत विभागलेली समाज व्यवस्था मोडून काढू. महिलांना सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण करू. त्यांचा आदर राखू. युवकांना रोजगार मिळेल, सर्वांना आरोग्य व्यवस्था चांगली मिळेल, शहरे, गावे, सुंदर होण्यासाठी चांगली व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करू. भ्रष्टाचार नष्ट करू, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी कटिबध्द राहू, कामगारांना न्याय देऊ, स्वाभिमानी, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आजन्म काम करत राहू, छत्रपतींचे आम्ही एकनिष्ठ मावळे आहोत याचा आम्हाला विसरणार पडणार नाही. अशी त्यांनी यावेळी शपथ दिली.