नवाब मालिकांनी मुंबईत बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले आणि त्यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे आलेले आहेत असा आरोप भाजपा आमदार श्वेता महाले यांनी लगावला आहे. तसंच शिवसेनेचं हिंदुत्व हे ढोंगीपणाच आहे. प्रत्यक्ष कृतीमधून ते कुठेही दिसत नाही. ते हिंदुत्व बाळासाहेबांसोबत निघून गेलेलं आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलीय.