कोरोनाच्या महामारी नंतर राज्यभरात होळीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरु आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या बेलोरा गावात अनोख्या पद्धतीने धुळवड साजरी केली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांच्या आईचं नुकतच निधन झालं. परंतु त्यातही त्यांनी अनोखी कल्पना साकारत संपूर्ण गाव रंगविण्याचा ध्यास यावेळी घेतला. यानिमित्ताने धुलिवंदनाच्या दिवशी संपूर्ण गावात रंगमय वातावरण पाहायला मिळालं.