शिवसेना नेता रघुनाथ कुचिक प्रकरणातील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली तरुणी अखेर सापडली असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिलीय. काल रात्री मला तिचा कॉल आला होता तेव्हा तिला इंजेक्शन देऊन काही लोकांकडून तिची सही घेण्यात आली. यात पोलीस देखील होते असे तिने सांगितल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तर या संदर्भात पुणे पोलिसांना सविस्तर कळवलं असल्याचं त्यांनी सांगितलंय.