'एक नोटीस आल्याने जळफळाट'; एकनाथ खडसेंचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

2022-03-15 45

देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस आली आणि काय त्यांचा तळफळाट सुरु झाला आहे. देवेंद्रजी म्हणतात मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली. भाजपात असताना तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली. माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या बायको बरोबर संबंध जोडले, अंजली दमानिया यांना माझ्यामागे लावलं, हे उद्योग कोणी केले? अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारले.

Videos similaires