राज्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना वेगवेगळ्या संस्था आणि समित्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष हेदेखील आझाद मैदान येथे आंदोलनाला बसले आहेत. ऑनलाइन रोलेट बिंगो जुगार बंद व्हावा तसेच जुगर चालवणाऱ्या मालकांवर मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी यासाठी नंदन भास्करे हे उपोषणाला बसले आहेत. गृहमंत्री हे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे असून देखील त्यांच्या पक्षाच्या युवकांना आंदोलनाला बसावे लागत आहे. जर या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई नाही केली तर आम्ही सर्व पक्षीय रस्त्यावर उतरु अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते आज अजित चव्हाण यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन शी बोलताना दिली आहे.