शनिवारी १२ मार्चला झालेला रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीचा पेपर फुटला नाही, असं निवेदन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिलं. शनिवारी १० वाजून २० मिनिटांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिलेला पेपर एका मुलीच्या मोबाईलमध्ये १० वाजून २४ मिनिटांनी आढळला. तो त्या मुलीकडे कसा आला, याविषयी पोलिसांकडून तपास करण्यात येतोय, अशी माहिती गायकवाडांनी दिली.
#VarshaGaikwad #12thPaperLeak #12thBoards #MaharashtraLegislativeAssembly #LegislativeAssemblySession #Live #BigNews #BreakingNews #esakal #SakalMediaGroup