संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज आजपासून सुरु झालं. लोकसभेचं कामकाज सुरु होताच भाजप खासदारांकडून मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी परदेशी पाहुण्यांचं सभागृहात स्वागत केल्यानंतर भाजप खासदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आता बास करा असं सांगूनही पुढे काही मिनिटं घोषणाबाजी सुरुच होती.
#NarendraModi #LokSabhaSession #PMModi #Modi #NationalNews #bjp #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup